
ladki bahin yojna updates: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्वाची माहिती
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. ई-केवायसी पूर्ण करूनही ज्या महिलांचा हप्ता बंद झाला आहे किंवा लाभ मिळालेला नाही, अशा लाभार्थी महिलांची शासनाकडून पुन्हा पडताळणी (Cross Verification) सुरू करण्यात आली आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, ई-केवायसीसाठी शासनाने मुदतवाढ दिली होती. त्यानंतर सर्व लाभार्थ्यांची सखोल पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या पडताळणीदरम्यान सुमारे 8 लाखांहून अधिक महिला योजनेस अपात्र आढळल्या आहेत. तसेच 13 ते 14 लाख महिलांचे वार्षिक उत्पन्न योजनेच्या पात्रता निकषांपेक्षा जास्त असल्याने त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही.
आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, ई-केवायसी करूनही ज्या पात्र महिलांना लाभ मिळालेला नाही, त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही. अशा सर्व प्रकरणांची स्वतंत्र पडताळणी सुरू असून पात्र लाभार्थींना न्याय मिळेल, यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
याशिवाय, संजय गांधी निराधार योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांपैकी कोणत्याही योजनेचा लाभ न मिळालेल्या पात्र महिलांचा समावेश किमान एका योजनेत करता यावा, यासाठीही शासन सकारात्मक पावले उचलत असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
लाडकी बहीण योजनेची e-kyc प्रक्रिया
- अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. उदा. Ladkibahin.maharashtra.gov.in
- Ekyc पर्याय निवडा. प्रथम होम पेज वर जाऊन ekyc banner वर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक आणि दिलेला kepcha टाका.
- तुमच्या आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर otp येईल. तो submit करा.
महाराष्ट्र लाडकी बहीण योजना फायदा
- महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेला पात्र असलेल्या महिलेला प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची रक्कम मिळते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – पात्रता
- मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेचा अर्जदार महिला असणे आवश्यक आहे.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा अर्जदार करणारी महिला ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराचे वय वर्ष हे 21 ते 65 या दरम्यान असावे.
- मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करणारी व्यक्तीचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहेया योजनेत अर्ज करणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार खालीलपैकी कोणत्याही एका प्रवर्गातील असावी, विवाहित महिला, विधवा महिला, घटस्फोटित महिला, परित्यक्ता व निराधार महिला, कुटुंबातील एक अविवाहित महिला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अपात्रतेचे निकष
- जर कुटुंबाचे आर्थिक उत्पन्नही दोन लाख 50 हजार पेक्षा जास्त असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तो अर्जदार पात्र ठरणार नाही.
- या योजनेत अर्ज करणारा व्यक्ती हा कोणत्याही प्रकारचे इन्कम टॅक्स न देणारा असावा म्हणजेच त्याचे उत्पन्नही कमी असावे.
- महाराष्ट्र माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज करणारा व्यक्ती हा कुटुंबातील सदस्य शासकीय विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत किंवा कर्मचारी म्हणून कार्यरत असल्यास किंवा पेन्शन घेत असल्यास या योजनेत अपात्र ठरेल.
- अर्ज करणाऱ्या महिलेस सरकारकडून अन्य कोणते योजनेतून दरमहा कोणत्याही योजनेतून 1500 रुपये मिळत असल्यास त्या व्यक्तीस महाराष्ट्र माझी लाडकी योजनेतून कोणतेही रक्कम किंवा लाभ मिळणार नाही.
- महाराष्ट्र माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेणाऱ्या कुटुंबातील कोणताही सदस्य विद्यमान खासदार आमदार असल्यास या योजनेस लाभ घेण्यास अपात्र ठरेल.
- महाराष्ट्र माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेणाऱ्या व्यक्ती हा व्यक्तीच्या नावावर कोणत्या प्रकारचे चार चाकी वाहन असल्यास या योजनेला पात्र ठरणार नाही (ट्रॅक्टर वगळता )
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थी महिलेचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
- आधार कार्ड.
- अधिवास प्रमाणपत्र (जर अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करता येईल.)
- परराज्यात जन्मलेल्या विवाहित महिलांसाठी – पतीचे १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र.
- उत्पन्नाचा दाखला (पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. पांढरे रेशन कार्ड किंवा रेशन कार्ड नसल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.)
- विवाह प्रमाणपत्र (नवविवाहित महिलेचे नाव रेशन कार्डमध्ये नसल्यास, पतीच्या रेशन कार्डाचा उत्पन्नाच्या पुराव्यासाठी वापर करता येतो.)
- – बँक खात्याचा तपशील (बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असणे आवश्यक आहे.)- हमीपत्र / स्वघोषणापत्र (Self Declaration / Declaration Form).
निष्कर्ष
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी लाभदायक ठरणारी योजना आहे. या योजनेतून महिलांना १५०० रूपये आर्थिक लाभ मिळतो. त्यातून आर्थिक दुर्बल असणाऱ्या महिलांना त्याचा खूप मोठा पाठिंबा मिळतो.
तसेच, महाराष्ट्रातील अजुन काही योजनांचा लाभ आपण घेऊ शकता.
लेक लाडकी योजना –Blog
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिक माहिती साठी या संकेत स्थळांवर भेट द्यावी.