लखपती दीदी योजना कोणाला पात्र आहे? लखपती दीदी योजना 2026: योजनेचे लाभ, पात्रता, आणि अर्ज प्रक्रिया

लखपती दीदी योजना कोणाला पात्र आहे?

लखपती दीदी योजना कोणाला पात्र आहे. याची सविस्तर माहिती

लखपती दीदी योजनेबद्दल माहिती

लखपती दीदी योजना ही स्त्रीला आर्थिक रित्या सशक्त करण्यासाठी राबवलेली योजना आहे. उद्याग क्षेत्रात आर्थिक रित्या पाठबळ देण्यासाठी सरकारने लखपती दीदी योजना स्थापन केली. या योजनेतून महिलांना स्वतःच्या स्वप्न बघायची एक संधी सरकाने देऊ पाहताय. या योजनेचा योग्य तो उपयोग केल्याने समाजात स्त्री उंच मानेन जगेल, ह्याची खात्री सरकारला आहे. लखपती दीदी योजनेतून सरकार स्त्रियांना 5 लाख पर्यंत कर्ज स्वरूपात रक्कम देते. या योजनेची सुरुवात 2023 ला झाली.

महाराष्ट्रातील लखपती योजना ही महिलांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी राबवण्यात येणारे महत्त्वाची योजना आहे महाराष्ट्र राज्यातील लाखो महिलांनी योजनेचा लाभ घेत आहे.  सध्या महाराष्ट्रातील 20 लाखाहन अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी देखील प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे

लखपती दीदी योजनेचा उद्देश

  • ग्रामीण भागात किंवा गावात असलेल्या लहान उद्योग ह्यांना प्राधान्य देण्यासाठी ही योजना राबवण्यात आली.
  • लखपती योजनेचा मुख्य उद्देश महिलांना सशक्त सशक्त बनवणे हा असून या योजनेमार्फत महिलांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते या कर्जातून महिलांना एक उद्योग उभारता यावा म्हणून ही योजना राबवण्यात आली आहे.
  • लखपती योजनेद्वारे महिला बचत गट जॉईन करू शकतात आणि त्याद्वारे आर्थिक स्थिती सुधारू शकते.

योजनेची वैशिष्ट्ये

  • लखपती दीदी योजना याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि स्वतःच्या बळावर उद्योगांवर तिचे उत्पन्न एक लाख पेक्षा जास्त करण्याचा उद्देश या योजनेचा आहे.
  • लखपती दीदी योजनेमार्फत महिलांना मोफत शिक्षण उदाहरणार्थ शिवणकाम अन्नप्रक्रिया शेती पशुपाल ड्रोन संचालन एलईडी ब्लड निर्मिती  यासारख्या अनेक व्यवसायांचे शिक्षण घेण्याची संधी मिळते.
  • महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रस्थान दिले जाते स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन केले जाते.
  • लखपती दीदी योजनेमार्फत पहिल्यांदा बँक व शासकीय योजनांद्वारे सोलापूर कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.
  • लखपती तिथी योजनेमार्फत महिलांना बाजारपठ उपलब्ध करून देणे आणि महिलांनी तयार केलेलं उत्पादनांच्या विक्री कसे सहाय्य करता येईल यात देखील मदत केली जाते.
  • या योजनेमार्फत आर्थिक साक्षरता पैशाची बचत गुंतवणूक बँकिंग आणि आर्थिक  नियोजनाबद्दल योग्य ते शिक्षण दिले जाते
  • या योजनेमार्फत महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने करावा आणि डिजिटल व्यवहार कशा पद्धतीने करावे ऑनलाईन विपणान कशा पद्धतीने करावी आधुनिक व्यवसाय पद्धतीचे प्रशिक्षण दिले जाते.
  • लखपती दीदी योजना मार्फत प्रथम ग्रामीण महिलांना प्राधान्य दिले जाते. ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांना विशेष हातभार दिला जातो.
  • विविध शासकीय किंवा सरकारी योजनांची जोडणी करून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ या महिलांना कसा मिळेल यासाठी देखील मदत केली जाते.
  • या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आत्मनिर्भर बनवणे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे जेणेकरून कुटुंबाचे उत्पन्न वाढवून त्याचे आयुष्य भरभराटीचे होईल स्वावलंबी होईल याकडे लक्ष दिले जाते.

लखपती दीदी योजनेच्या पात्रता

  • लखपती दीदी योजना इच्छुक महिलाही स्वयंसहायक बचत गटाचे सदस्य असणे गरजेचे आहे
  • लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय वर्ष 18 ते 55 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • लखपती दीदी योजना भाग घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • लखपती दीदी योजना आहे बचत गट महिलांना प्राधान्य देते त्यामुळे ज्यावेळी योग्य ती प्रशिक्षण दिले जाते त्यावेळी त्या महिलेने ते शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणे गरजेचे आहे.
  • लखपती दीदी मध्ये महिलेला उत्पन्न वाढ व स्वयंरोजगार यामध्ये रस असणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया

लखपती दीदी योजनेचा अर्ज हा ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे भरला जातो.

ऑनलाइन अर्ज कसा भरायचा?

  • प्रथम पोर्टल वर जाऊन गव्हर्मेट वेबसाईटवर जा.
  • लखपती दीदी योजनेमार्फत आवश्यक असलेली माहिती पूर्णपणे भरा.
  • आवश्यक असलेले कागदपत्र आणि व्यवसाय नियोजन आराखडा त्यामध्ये अपलोड करा.
  • सर्व माहिती भरून झाल्यावर आम्ही जमा करा.

ऑफलाइन अर्ज कसा भरायचा?

  • ऑफलाइन अर्ज भरण्याच्या अगोदर तुम्ही सार्वजनिक बचत गट यांच्याशी जोडले गेले असणे गरजेचे आहे.
  • तुमची जवळ तुमच्या जवळची बँक ग्रामपंचायत कार्यालय किंवा स्थानिक ग्रामपंचायत विकास केंद्रावर जाऊन अर्ज भरावा
  • लागणारी योग्य ती कागदपत्रे त्यांच्याकडे जमा करावी.

लखपती दीदी योजनेचे फायदे

  • लखपती दीदी योजना यांचे मुख्य फायदा म्हणजे महिलांना सशक्त करणे हा असून त्या मार्फत महिलांना शिवणकाम Dron उडवण्याचे प्रशिक्षण आधुनिक शेती तंत्र एलईडी बल्ब निर्मित करणे यासारख्या शैक्षणिक विषयावर शिक्षण दिले जाते
  • लखपती योजनेमार्फत ज्या महिलांना स्वतःच्या बळावर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना सरकारकडून एक लाख ते पाच लाखांपर्यंत बिनव्याचे कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाते. ही कर्ज सुविधा बिनव्याजी असल्याने महिलांना योग्य तो व्यवसाय कोणताही आर्थिक भार घेऊन करावा लागत नाही.
  • लखपती दीदी योजना या योजनेमार्फत महिलांना त्यांनी उत्पादन केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी विक्री केंद्र तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म जोडण्यासाठी मदत केली जाते.
  • या सर्व उपक्रमातून महिलाही आत्मनिर्भर कौशल्य संपन्न आणि स्वतःच्या पायावर उभा राहिला शिकते म्हणजेच ती महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनते.
  • लखपती दीदी योजनेअंतर्गत आतापर्यंत भारतातील सुमारे दोन कोटी महिला लखपती दीदी बनल्या आहेत, या योजनेतून महिलांना आर्थिक पाठबळ मिळत असल्याने अजून हा आकडा जलद गतीने वाढत आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • आधारकार्ड
  • पॅनकार्ड
  • बँक खाते बुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उत्पन्नाचा दाखला
  • पत्त्याच्या पुरावा
  • नोंदणीकृत मोबाईल नंबर

निष्कर्ष

लखपती दीदी योजना आहे महाराष्ट्रातील महिलांना सक्षम आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम स्वावलंबी आणि उत्तेजक बनवण्याच्या हेतूने  आखली गेलेली योजना आहे.

या योजनेमार्फत महिलांना आर्थिक पाठबळ, वेगवेगळे उद्योग चालू करण्यासाठी प्रशिक्षण मिळते. म्हणून महिलांना कोणताही लघुउद्योग असो किंवा कोणताही उद्योग असो चालू करण्यासाठी पाठबळ दिले जाते. लखपती दीदी योजनेचा योजनेचा मुख्य उद्देश हा महिलांचं आर्थिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त करण्याचा आहे.

लखपती दीदी योजनेमार्फत महिलांचा आर्थिक तसेच सामाजिक राहणीमानात सुधारणा होते. राहणीमानात सुधारणा झाल्यावर त्यांचे कुटुंब योग्य रित्या त्यांची स्वप्न पूर्ण करण्यास त्यांना मदत होईल.

तुम्ही जर कोणत्याही बचत गटाशी जोडलेल्या असतात आणि तुम्ही कोणताही लघु उद्योग करू इच्छित असा तर या योजनेचा अवश्य लाभ घ्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न FAQ?

लखपती दीदी योजनेचा उद्देश काय आहे? लखपती दीदी योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांना योग्य त्या प्रकारे उद्योगांसाठी मदत करणे हा आहे. या योजनेमार्फत महिलांना उद्योगासाठी एक ते पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळते.

लखपती दीदी योजनेसाठी कोण पात्र आहे? लखपती दीदी योजनेत सहभाग घेण्यासाठी महिलांचं वय वर्ष 18 ते 55 मध्ये असणे गरजेचे आहे. आणि ही महिला बचत गटाची सदस्य असणे गरजेचे आहे.

लखपती दीदी योजनेचा अर्ज (फॉर्म) कसा भरावा? लखपती तिथी योजनेचा अर्ज हा ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे भरता येतो. ऑफलाइन हा अर्ज जवळच्या ग्रामपंचायत मध्ये आणि ऑनलाईन अर्ज गव्हर्मेंट वेबसाईट द्वारा भरला जातो.

लखपती दीदी योजनेसाठी कागदपत्रे कोणकोणते लागतात? लखपती दीदी योजनेसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्न दाखला, स्थानिक पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबुक, इत्यादी.

लखपति दीदी योजना ची वेबसाईट कोणती आहे? https://lakhpatididi.gov.in/Lakhpati didi a official portal ही लखपती दीदी योजनेचे वेबसाईट आहे यामध्ये तुम्हाला योजनेसाठी लागणारे कागदपत्र, पात्रता, अर्ज प्रक्रिया या प्रकारचे विविध माहिती मिळेल.

Leave a comment