महाराष्ट्र विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना 2026: आवश्यक कागदपत्रे, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना

विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना – खुल्या श्रेणीतील गुणवान मुले आणि मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

महाराष्ट्र सरकारने उच्च शिक्षणासाठी उच्चशिक्षित व तंत्रज्ञान विभागाने 4 ऑक्टोबर 2018 रोजी उच्चशिक्षित विद्यार्थ्यांसाठी खुल्या श्रेणीतील गुणवान मुले मुलींसाठी बाहेरील देशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना आयोजन आणले आहे या योजनेत महाराष्ट्र राज्यातील ओपन व जनरल श्रेणीतील विद्यार्थी ज्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा आहे की दरवर्षी या शिष्यवृत्तीचा योग्य त्या परीने लाभ घेऊ शकतात.

जनरल व ओपन श्रेणीतील विद्यार्थी बाहेर देशी नामांकित असलेल्या विद्यापीठांमध्ये जाऊन विविध प्रकारचा अभ्यासक्रमात भाग घेऊ शकतात त्यासाठी या शिष्यवृत्ती योजनेचा फायदा होतो. शिष्यवृत्ती योजनेसाठी दरवर्षी वीस विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना – फायदे

  • शिष्यवृत्ती योजने तून विद्यार्थ्यांसाठी बाहेर देशातील विद्यापीठाने नमूद केलेल्या सर्व क्षण खर्च सरकार भरणार आहे
  • या योजनेअंतर्गत वैयक्तिक आरोग्य विम्याची रक्कम ही सरकारकडून देण्यात येईल.
  • या योजनेसाठी इच्छुक असलेल्या लाभार्थ्याला प्रवासाचे विमान भाडे हे फक्त एक वेळ दिले जाते

विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना- पात्रता

  • शिष्यवृत्ती योजनेत अर्ज केलेल्या उमेदवाराचे आई-वडील किंवा पालाची भारताचे नागरिक आणि महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • शिष्यवृत्ती योजना ही महाराष्ट्र राज्यातील ओपन गटातील आणि जनरल गटातील विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आले आहे.
  • इतर जातीचे विद्यार्थी जे खुल्या गटातील जातीतून अर्ज करू इच्छितात त्या विद्यार्थ्यांनी देखील शिष्यवृत्ती अर्ज करण्यास पात्रता दिली जाते.
  • या योजनेत इच्छुक असलेल्या अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आहे आठ लाखापेक्षा कमी असावे
  • या योजनेत सहभाग घेणाऱ्या अर्जदाराचे प्रदेशातील शैक्षणिक संस्थेकडून बिनशर्तीचे प्रमाणपत्र प्रस्ताव येणे गरजेचे आहे.
  • पदव्युत्तर शिक्षणासाठी, पदव्युत्तर शिक्षणानंतर पदविका आणि परदेशी शैक्षणिक संस्थेतील पीएच. डी. अभ्यासक्रमांसाठी, टी. ई. (टाइम्स हायर एज्युकेशन)/किंवा क्यू. एस. (क्वाक्वेरेली सायमंड्स) क्रमवारी 200 च्या आत असणे आवश्यक आहे.

विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना – अर्ज प्रक्रिया

  • शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी ऑनलाईन अर्ज मागवले जातात.
  • अर्जदाराने तांत्रिक शिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला/पोर्टलला भेट द्यावीःwww.dtemaharashtra.gov.in
  • अर्जदाराने अधिकृत संकेतस्थळावर स्वतःची नोंदणी करावी.
  • त्यानुसार, उमेदवारांच्या तपशीलाची छाननी केल्यानंतर आणि पात्रतेच्या अटी/अटी तपासल्यानंतर, प्रशिक्षण संचालनालयाला अंतिम मुदतीपर्यंत ऑनलाईन पोर्टलवर अर्ज प्राप्त होतो. एक यादी तयार केली जाईल.

आवश्यक कागदपत्रे

  • ओळख पुरावा
  • अधिवास प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • परदेशातील शैक्षणिक संस्थेकडून बिनशर्त प्रस्ताव पत्र.
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे
  • संबंधित उमेदवाराचा पारपत्र
  • उमेदवार नोकरी करत असल्यास ना-हरकत प्रमाणपत्र.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न FAQ?

विद्यार्थ्यासाठी कोणत्या सरकारी योजना आहेत? विद्यार्थ्यांसाठी PMSS (पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना), पंतप्रधान इंटर्नशिप स्कीम (पीएम इंटर्नशिप स्कीम), PM-यशास्वी शिष्यवृत्ती योजना, विद्या लक्ष्मी एज्युकेशन लोन स्कीम ह्या योजना विद्यार्थ्यांना महत्वाच्या योजना आहेत

उच्च शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती म्हणजे काय?जे विद्यार्थी सर्व गुण संपन्न म्हणजेच आपल्या उच्च शिक्षणासाठी बाहेर गावी शिक्षण घेऊ इच्छित आहेत अशा विद्यार्थ्यांना सरकार कडून योग्य तो पाठिंबा दिला जातो.

या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?ओपन आणि जनरल श्रेणीतील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), प्रवेशपत्र, गुणपत्रिका, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि इतर आवश्यक कागदपत्रे.

या योजनेसाठी अर्ज कसा भरला जातो?या योजनेसंबंधित Government संकेत स्थळांवर भेट देऊन पोर्टल वर जाऊन आवश्यक माहीत देऊन आपली कागदपत्रे अपलोड करावी.

उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजनेसाठी अधिक माहिती साठी खाली दिलेल्या संकेत स्थळाला भेट द्या.

https://www.myscheme.gov.in/

अधिक सरकारी योजनांच्या माहिती साठी खालील ब्लॉग पहा.

Blog

Leave a comment