लेक लाडकी योजना

योजनेची माहिती

लेक लाडकी योजना महाराष्ट्रातील लेकीन साठी खुप महत्वाची आहे. ही योजना राज्य सरकारने महाराष्ट्रातील १८ वर्षाखालील महिलांसाठी लागू होते. माहिती खालील प्रमाणे

लेक लाडकी योजनेचा उद्देश

ही योजना चालू करण्याच्या मुख्य उद्देश मुलींच्या शिक्षणासाठी हातभार लागावा हा आहे. कमी उत्पन्न असल्या कारणाने अनेक मुलींचे शिक्षण पूर्ण होत नाही त्यासाठी ही योजना उपयुक्त आहे. ही समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने १८ वर्षा खालील मुलीं साठी ही योजना लागू केली आहे. ही योजना राज्य सरकारने २०२३ पासून लागू केली आहे. ह्या योजनेच मुख्य नाव लेक लाडकी योजना अस ठेवण्यात आलं .

योजनेची वैशिष्ट्ये

  1. या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बाल विवाहाला आळा घालने हा आहे.
  2. समाजातील आर्थिक दुर्बळ असणाऱ्या कुटुंबांना हातभार मिळवण्यासाठी.

योजनेचे फायदे खालील प्रमाणे:

  • लेक लाडकी योजना पात्र असलेल्या मुलींना १८ वर्ष पूर्ण होई पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.
  • मुलीच्या जन्मानंतर -५०००
  • इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतल्यावर -६०००
  • इयत्ता सहावी मध्ये प्रवेश घेतल्यावर – ७०००
  • मुलगीची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर ७५,०००/- शेवटचा हप्ता दिला जातो.
  • एकूण १ लाख १ हजार रक्कम दिली जाते.
  • ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होते.

योजनेसाठी पात्रता :

  • अर्ज करणारा रहिवासी हा महाराष्ट्र राज्याचा असावा.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न १ लाखा पेक्षा कमी असावे.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे बँक खाते महाराष्ट्र बँकेत असणे गरजेच आहे.
  • १ एप्रिल २०२३ च्या नंतर जन्मलेली मुलगी ह्या योजनेला पात्र ठरेल.
  • केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड कुटुंबातील मुलगी ह्या योजने साठी पात्र ठरेल.
  • एका कुटुंबातील जास्तीत जास्त २ मुलीं ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

लेक लाडकी योजना महत्वाच्या अटी:

  • लाभार्थाची रक्कम ही महाराष्ट्र बँकेत जमा होते त्यामुळे बँक खाते असणे बंधनकारक राहील.
  • दिलेली कागदपत्रे आणि दिलेली सर्व माहिती खरी असणे आवश्यक आहे.
  • दिलेला अर्ज शासनाकडून तपासल्यानंतर ह्या योजनेचा लाभ मिळतो.

आवश्यक कागदपत्रे :

  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे रहिवासी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  • मुलीच्या वडिलांचे आधारकार्ड.
  • वार्षिक उत्पन्न दाखला
  • बँक पासबुक
  • केसरी किंवा पिवळे रेशनकार्ड असणे गरजेचे आहे.
  • मुलीचा जन्म दाखला
  • स्व घोषणा प्रमाणपत्र
  • मुलगी शिक्षण घेत असल्यास मुलीचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
  • शेवटचा लाभ लाभ घेण्यासाठी मुलीचे मतदान ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
  • पासपोर्ट साईज फोटो

अर्ज करण्याची प्रक्रिया :

  • सर्व प्रथम आपल्या जवळच्या अंगणवाडीला भेट द्यायची.
  • या योजनेचा अर्ज अंगणवाडीत किंवा आशा सेविका केंद्रात भरला जातो.
  • अंगणवाडी सेविका कडे या योजनेमार्फत फॉर्म मिळतो.
  • आवश्यक माहिती फॉर्म मध्ये भरणे गरजेचे आहे. उदा. नाव, मोबाईल क्र. , पत्ता, आधारकार्ड क्रमांक, इत्यादी.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  • भरलेला अर्ज अंगणवाडी सेविकेकडे जमा करावा.
  • भरलेल्या अर्जाची ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे.
  • ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला एक पावती दिली जाईल. ती पावती आपल्याकडे जपून ठेवावी.

आवश्यक सूचना :

  • अर्जदाराने दिलेली सर्व माहिती अचूक असणे बंधनकारक राहील.
  • माहिती चुकीची आढळल्यास स्वतः अर्जदार त्याला जबाबदार राहील.
  • शासनाच्या पडताळणीत दिलेली माहिती खोटी आहे किंवा बनावट कागदपत्रे असल्याचे निदर्शनात आल्यास त्या अर्जदाराने दिलेला फॉर्म रद्द केला जातो.
  • आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई देखील केली जाते.
  • दिलेली सर्व माहिती योग्य असावी जेणे करून अर्जदारास लाभार्थाचा फायदा होऊ शकेल.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

  1. अर्जामध्ये खोटी माहिती दिल्यास काय होईल? उत्तर: पडताळणीदरम्यान माहिती खोटी आढळल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो किंवा मंजूर झालेला लाभ रद्द केला जाऊ शकतो. शासनाच्या नियमांनुसार पुढील कारवाईही होऊ शकते.

2. चुकीची कागदपत्रे अपलोड केल्यास अर्ज मंजूर होईल का? उत्तर: नाही. बनावट किंवा चुकीची कागदपत्रे सादर केल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो.

3. अर्जातील माहितीची पडताळणी केली जाते का? उत्तर: होय. संबंधित विभागाकडून अर्जातील माहिती व कागदपत्रांची पडताळणी केली जाऊ शकते.

4. चुकीची माहिती चुकून भरली असल्यास काय करावे?उत्तर: शक्य असल्यास अर्जात दुरुस्ती करा किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधून योग्य माहिती सादर करा.

5. अर्जदाराने कोणती काळजी घ्यावी? उत्तर: अर्ज भरताना सर्व माहिती अचूक द्यावी, वैध कागदपत्रे जोडावीत आणि अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व तपशील एकदा तपासावेत.

निष्कर्ष :

या लेखांमध्ये योजनेचा लाभ कोणकोण घेऊ शकत किंवा कोणती व्यक्ती ह्यासाठी पात्र आहे हे सविस्तर रित्या सांगितलं आहे. ह्या योजने साठी पात्र असणाऱ्या व्यक्तीने ह्याचा योग्य तो लाभ घ्या. अर्ज सादर करताना नेहमी योग्य माहिती द्या.

लेक लाडकी योजनेविषयी अधिक माहिती विषयी तुम्ही Government संकेत स्थळांचा वापर करा.