
महाराष्ट्र पिक विमा योजना माहिती
2016पासून महाराष्ट्र च्या सर्व राज्यात पीक विमा योजना राबवली जाते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या अध्यक्षेखाली या नवीन ‘ फसल विमा योजना, चालू करण्यात आली.
योजनेचा उद्देश
- शेतकऱ्याचे नैसर्गिक रित्या निसर्गापासून , किंवा कीटक नाशकांपासून होणारे नुकसान लक्षात घेता शेतकऱ्याच्या आर्थिक मदती साठी हा विमा हातभार देतो.
- शेतकऱ्याला नवनवीन शेती पद्धतीने शेती करता यावी यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे.
- होणाऱ्या नुकसानामुळे शेतकरी खचून न जाता त्याला आर्थिक पाठिंबा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
- कृषिक्षेत्राला सतत पतपुरवठा करत राहणे, त्यामुळे लोकांना अन्न योग्यरित्या मिळेल. कृषी क्षेत्रात आपला देत पुढे जाण्याच्या हेतूने आपला शेतकरी वर्ग काम करत रहावा ह्या हेतूने ही योजना चालू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पिक विमा योजना – पात्रता
- शेतात खूप पाणीसाठी मुले शेताची नासधूस होणे. पूर येण्याने शेतीची नासधूस होणे, ह्या परिस्थितीत विमा शेतकऱ्याला भरपाई म्हणून किंवा दावा रक्कम दिली जाते.
- जर शेत काढायच्या अगोदर शेतात वादळ, आपत्ती किंवा जास्त पावसाने शेताची नासधूस झाल्यास शेतकऱ्यांना दावा रक्कम मिळते.
महाराष्ट्र पिक विमा योजना – आवश्यक कागदपत्रे
- आधारकार्ड
- ७/१२ उतारा आणि ८-अ उतारा
- बँक पासबुक
- पेरणी प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
अर्ज कसा करायचा ?
- पिक विमा योजना ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे अर्ज भरता येतो.
- प्रधानमंत्री पिक विमा साईट वर जावा.
- Former corner वर जा.
- शेतकरी म्हणून रजिस्ट्रेशन करा.
- तुमच्या मोबाईल नंबर देऊन login करा.
- विचारलेली सर्व माहिती अचूक स्वरूपात भरा. जसे की, तुमचे गाव, तुम्ही कोणत पिक घेता, तुमच्या पेरणीच क्षेत्र कोणत आहे, इत्यादी.
- तुमचे कागदपत्रे स्कॅन करून सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्या.
- Make payment वर जा. तुम्ही निश्चित केलेल्या प्रीमियम चे पेमेंट करा. तुम्हाला एक पावती मिळेल ती जपून ठेवा.
ऑफलाईन(offline) अर्ज कसा भरायचा ?
- तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन फॉर्म भरू शकता.
- आपल्या गावातील सरकार केंद्र मध्ये जाऊन फॉर्म भरू शकता.
किती प्रीमियम भरावा लागतो ?
शेतकऱ्यांना भरावा प्रीमियम चा हप्ता खूप कमी असतो. खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी पिकांसाठी १.५ टक्के, आणि व्यावसायिक असलेल्या पिकांसाठी थोडी जास्त ५ टक्के premium भरावा लागतो. राहिलेला हिस्सा हा राज्य शासन आणि केंद्र सरकार भरते.
आवश्यक सूचना
- अर्जदाराने अर्ज भरण्यापूर्वी त्याची पात्रता तपासणे गरजेचे आहे.
- अर्जामध्ये लिहिलेल्या अटी आणि नियम काळजीपूर्वक वाचा.
- दिलेली कागदपत्रे योग्य असणे गरजेचे आहे
- फॉर्म भरताना कागद पत्रे स्पष्ट स्वरूपात upload करणे गरजेचे आहे. कागदपत्रे अस्पष्ट असल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1.पिक विमा योजना म्हणजे काय? उत्तर: पिक विमा योजना ही शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, पूर, गारपीट, चक्रीवादळ तसेच इतर जोखमींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक संरक्षण देणारी सरकारी योजना आहे.
2. या योजनेचा लाभ कोणाला मिळतो? उत्तर: अधिसूचित पिकांची लागवड करणारे आणि योजनेच्या पात्रता निकषांची पूर्तता करणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
3.अर्ज कसा करावा? उत्तर: शेतकरी ऑनलाइन पोर्टल, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC), बँक किंवा संबंधित कृषी विभागामार्फत अर्ज करू शकतात.
4. अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?उत्तर: आधार कार्ड, बँक पासबुक, जमिनीची कागदपत्रे, पेरणीचा तपशील तसेच आवश्यकतेनुसार इतर कागदपत्रे.
5. विमा हप्ता (प्रीमियम) किती भरावा लागतो? उत्तर: विमा हप्ता पिकाचा प्रकार, हंगाम आणि शासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार वेगवेगळा असू शकतो.
6. कोणत्या पिकांचा विमा काढता येतो? उत्तर: शासनाने अधिसूचित केलेल्या पिकांचाच या योजनेअंतर्गत समावेश केला जातो.
7. कोणत्या परिस्थितीत विम्याचा लाभ मिळतो? उत्तर: दुष्काळ, पूर, गारपीट, चक्रीवादळ, अतिवृष्टी तसेच शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीवर लाभ मिळतो.
8. पीक खराब झाल्यास काय करावे? उत्तर: निश्चित कालावधीत संबंधित विमा कंपनी, कृषी विभाग किंवा हेल्पलाइनवर पिकांच्या नुकसानीची माहिती द्यावी.
9. विमा दावा (Claim) कसा करावा? उत्तर: नुकसानीची माहिती दिल्यानंतर आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. पडताळणी झाल्यानंतर पात्रतेनुसार दावा निकाली काढला जातो.
10. विमा दाव्याची रक्कम कशी मिळते? उत्तर: मंजूर झालेली विमा रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.
11. अधिक माहिती कुठे मिळेल? उत्तर: संबंधित कृषी विभाग, विमा कंपनी, CSC केंद्र किंवा अधिकृत शासकीय पोर्टलवरून अधिक माहिती मिळवता येते.
निष्कर्ष
- पिक विमा योजना शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते.
- होणाऱ्या वाईट नुकसाना पासून बचाव करण्यासाठी ही योजना उपयोगात येते.
- पिक विमा योजने नुसार कोणताही शेतकरी आपल्या नुकसान भरपाई विम्याच्या स्वरूपात प्राप्त करू शकतो.
- पिक विमा योजना शेतकऱ्यासाठी खुप महत्वाची योजना आहे त्याचा त्यांनी लाभ घेणे गरजेचे आहे.
1 thought on “Maharashtra Pik vima yojna – महाराष्ट्र पिक विमा योजना”