
महाराष्ट्रात नाहीतर जगभरात राहणाऱ्या सर्व कुटुंबाच स्वप्न असत की स्वतःच घर असावं, परंतु आर्थिक स्थिती मुळे ते स्वप्न अपूर्ण राहत. महाराष्ट्र सरकारने ही परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र घरकुल योजनेचे आवेदन केले आहे.
हा पूर्ण ब्लॉग आपल्याला घरकुल योजनेबद्दल अर्ज कश्या प्रकारे भरायचा, त्यासाठी कोणकोण पात्र आहे, लागणारे कागदपत्रे, त्याची ऑनलाइन नोंद कशी करतात ह्याची संपूर्ण माहिती आहे.
महाराष्ट्र घरकुल योजना 2026 माहिती
महाराष्ट्र घरकुल योजना 2026 ही अनुसूचित जाती, अनुसूची जनजाती वर्ग, अन्य मागास वर्ग (OBC), दारिद्र रेषेखालील लोकांसाठी ही योजना महाराष्ट्र सरकारने चालू केली आहे.
महाराष्ट्र घरकुल योजनेच्या पात्रता
- अर्ज करणारा व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
- अर्ज करणाऱ्या व्यक्ती जवळ राहण्यासाठी घर नसायला पाहिजे.
- विधवा महिला, अनुसूचित जाती, अन्य मागास वर्गीय जातींना प्रथम दिले जाते.
- अर्ज करणाऱ्या व्यक्ती जवळ आधार कार्ड आणि आधार कार्ड ला बँक खाते लिंक असणे गरजेचे आहे.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न EWS (आर्थिक रित्या दुर्बळ) आणि LIG (कमी उत्पन्न गट) असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र घरकुल योजना २०२६ साठी अर्ज प्रक्रिया पुढील प्रमाणे
जर तुम्ही हा विचार करत असाल तर आपण कोणत्या पद्धतीने अर्ज भरू शकतो तर मी सांगू इच्छितो आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने फॉर्म भरू शकतो.
ऑनलाईन अर्ज कसा भरायचा?
- महाराष्ट्र सरकारच्या घरकुल योजनेच्या वेबसाइटवर जा.
- वेबच्या होम पेज वर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पर्याय निवडा.
- आधारकार्ड नंबर, नाव, सर्व महत्वाची माहिती भरा.
- एक लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करा.
- आपले कुटुंब , व्यवसाय , सध्या आपली राहायची स्थिती ही सर्व माहिती भरा.
- आपले आधारकार्ड, जातीचा दाखला, रेशन कार्ड , फोटो ही सर्व माहिती अपलोड करा.
- सर्व माहिती जमा केल्यावर फॉर्म जमा करा. आणि पावती घ्या.
ऑफलाईन अर्ज कसा भरायचा?
- आपले स्थानिक ग्रामपंचायत, नगर पालिका कार्यालयात जा.
- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून फॉर्म घ्या. तो योग्य रीत्या भरा.
- आवश्यक कागदपत्रे त्यासोबत जोडा आणि त्याच्याकडे फॉर्म जमा करा.
अर्ज भरण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते?
- आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र किंवा शासनाने जारी केलेले कोणतेही फोटो ओळखपत्र
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- बँक खात्याच्या पासबुकची प्रत
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
- रहिवासी पुरावा
महाराष्ट्र घरकुल योजना 2026 साठी अर्ज का करावा?
- आपल्याला जर घर बांधणी किंवा घर खरेदी करायचं असेल तर ही योजना आपल्याला उपयुक्त ठरते
- चांगल्या घरामुळे आपल्या राहणीमानात देखील सुधारणा होते.
- वंचित व पात्र घटकांना प्राधान्याने घरकुलाचा लाभ दिला जातो.
- योजना मंजूर झाल्यानंतर येणारी रक्कम ही अर्जदाराच्या बँक खात्यात जमा होते त्यामुळे मध्यस्थांचा धोका टळतो.
- प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या राष्ट्रीय गृहनिर्माण योजनांशी समन्वय साधून अधिक लाभ मिळण्यास मदत होते.
घरकुल योजनेचे फायदे
- महाराष्ट्र घरकुल योजनेचा फायदा म्हणजे घर सवलतीच्या दरात उपलब्ध होतात.
- विधवा महिला , अनाथ आणि काही जमिनी (भूमिहीन) असलेल्या व्यक्तींसाठी ही योजना उपयुक्त आहे.
- महाराष्ट्र घरकुल योजनेच्या माध्यमातून वीज, पाणी माणसाला लागणाऱ्या मूलभूत सुविधा असलेली चांगली घर उपलब्ध करून दिली जातात.
- महाराष्ट्र घरकुल योजना पारदर्शक आणि विश्वासू बनवण्याच्या हेतूने अर्ज भरण्याची प्रक्रिया डिजिटल करण्यात आली आहे.
- महाराष्ट्र सरकारच्या सहाय्याने विकसित केलेल्या ग्रामीण भागात किंवा गावात योग्य त्या राहणीमानात राहायची संधी मिळते.
ग्रामीण महाराष्ट्रात घरकुल योजना 2026 ची अंमलबजावणी कशी केली जाईल?
- महाराष्ट्र घरकुल योजना अंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण भागात कोणाला घरांची जास्त गरज आहे ह्याची तमासणी करून त्याची अंमलबजावणी केली जाते.
- गावातील ग्रामपंचायत समितीकडून महाराष्ट्र घरकुल योजनेला पात्र असलेल्या कुटुंबाची ओळख आणि निवड केली जाते.
- महाराष्ट्र घरकुल योजनेच्या सहाय्याने महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेल्या आराखडा नुसार बांधकाम केले जाते.
- शेतकरी, भूमिहीन मजूर आणि आदिवासी समाजाला विशेष प्राधान्य दिले जाते.
- मंजूर केलेल्या आराखड्यानुसार काम होत आहे की नाही याची तपासणी डिजिटल प्रणाली द्वारे सतत देखरेख ठेवली जाते.
निष्कर्ष
महाराष्ट्र घरकुल योजना ही महाराष्ट्रातील गरजू लोकांसाठी महत्वाची योजना आहे. तरी जास्तीत जास्त कुटुंबांनी या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांची पूर्तता करावी . योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, पात्रता बदलू शकतात तरी अर्ज करण्यापुर्वी सांकेतिक स्थळांवर भेट द्यावी.
महाराष्ट्र घरकुल योजनेच्या संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न FAQ
1.महाराष्ट्र घरकुल योजना म्हणजे काय? उत्तर – महाराष्ट्र घरकुल योजना म्हणजे आरती दुसऱ्या मागास असलेल्या व्यक्तींना घर उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राबवलेली एक योजना आहे.
2.महाराष्ट्र घरकुल योजनेचा लाभ हा कोणाला मिळू शकतो? उत्तर – ग्रामीण भागात राहणाऱ्या किंवा घर नसलेल्या तो कच्च्या घरात राहणाऱ्या आणि सरकारने पात्र असलेल्या व्यक्तीला महाराष्ट्र गरजेनुसार लाभ मिळू शकतो.
3.महाराष्ट्र घरकुल योजनेचा अर्ज कसा करावा? उत्तर – आपल्या गावातील ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती किंवा शासनाचे कार्यालय यामध्ये महाराष्ट्र योजनेच अर्ज केला जातो.
4.महाराष्ट्र घरकुल योजनेचा अर्ज भरताना लागणारी कागदपत्र कोणती? उत्तर – आधारकार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक, इतर..
5.घरकुल योजनेत आर्थिक मदत किती मिळते? उत्तर – घरकुल योजनेत आर्थिक मदत ही लाभार्थ्याच्या श्रेणीनुसार मिळत असते, सरकारच्या नियमानुसार नंतर ती सुनिश्चित केली जाते.
6.महाराष्ट्र घरकुल योजनेचा लाभ किती वेळा मिळू शकतो ? उत्तर – महाराष्ट्र घरकुल योजनेचा लाभ हा फक्त पात्र असल्या कुटुंबाला एक वेळ मिळू शकतो.
7.महाराष्ट्र घरकुल योजनेची अधिक माहिती कुठे मिळेल? उत्तर – गावातील ग्राम पंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा सरकारी संकेतस्थळावर या योजनेविषयी अधिक माहिती मिळू शकते.
महाराष्ट्र घरकुल योजना इतर माहिती साठी या संकेत स्थळांवर भेट द्या.